रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलांच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचे दर पुन्हा भडकले आहे. भारत हा खाद्यतेलाची सर्वाधिक मागणी असलेला देश आहे. गेल्या आठवड्याभरात खाद्य तेलाच्या दरात जवळपास १० ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे.देशात दरवर्षी एकूण मागणीच्या सुमारे ७० टक्के खाद्यतेलाची आयात केले जाते. तर देशात मागणीच्या ३० टक्के खाद्यतेलाची निर्मिती देशात होते.

भारताला दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करावी लागते. त्यामध्ये सर्वाधिक आयात पामतेलाची होत असून इंडोनेशियावरून हे तेल कच्च्या स्वरूपात मागवले जाते. ऐन लग्नसराईमध्ये खाद्यतेलाच्या किमती किलोमागे २० रुपयांनी भडकल्या आहेत. सर्वाधिक मागणी पामतेल, त्यानंतर सोयाबीन व तिसऱ्या क्रमांकावर सूर्यफुल तेलाची असते. पण मागणीच्या जेमतेम १५ टक्के तेल उत्पादन भारतात होते.

तेलाची आवक कमी झाल्यामुळे आठवड्याभरात १० ते १५ रुपयांनी दरवाढ झाली आहे. आणखी दरवाढ होईल या भीतीने नागरिकांना तेलाची दुप्पट खरेदी करीत असल्याचे दिसून आले. अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याने तेलबियांचा तुटवडा निर्माण झाला. जळगाव सोयाबीन तेल बहुतांश प्रमाणात भारतात तयार होते. पण यंदा त्याचे गणितही बिघडलेले असल्याने सोयाबीन तेल उत्पादनात पाच टक्क्यांची घट आहे.

तेलाच्या सर्वाधिक वाढ ही मोहरीच्या तेलात २० रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, शहरात तेलाची होणारी आवक देखील ३० ते ४० %कमी झाली आहे. त्यामुळे सूर्यफुल तेल आयातीवरच देशातील खाद्यतेलाची भिस्त आहे. तसे असताना रशिया-युक्रेन युद्धामुळे या तेलाची आयातदेखील संकटात आली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like