तापमानात वाढ तर विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वाधिक उन्हाचा कडाका
खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | राज्यात उन्हाचा चटका बसू लागले आहे. थंडी कमी झाली असून शिवरात्रीनंतर तीव्र उन्हाच्या झळा जाणवू लागणार आहेत. मार्च महिन्यातील पहिला आठवडा जळगावसह धुळे आणि नंदुरबारकरांसाठी सर्वाधिक तापमान असणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत उन्हाचा पारा सातत्याने वाढत असून बहुतांश ठिकाणी तापमानाचा ३५ अंशांच्या वरच आहे. तापमानातील ही वाढ पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंशांवर गेले आहे. पुढील आठवड्यात त्यात आणखी वाढ हाेऊन ५, ६ आणि ८ मार्च राेजी पारा ४१ अंशांवर जाईल. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात ५ आणि ६ मार्च राेजी पारा ४१ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात शेवटच्या आठवड्यात तापमान ३९ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये तापमान पहिल्या आठवड्यात ३६ अंशांपर्यंत तर २५ मार्चनंतर पारा ३९ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत मार्च महिन्यातील पहिला आणि शेवटचा आठवडा अधिक उष्ण राहणार आहे. तर हा पारा ४१ अंशांपर्यंत जाईल.विदर्भ अन् मराठवाड्यात मार्चअखेर तापमानात वाढ
मराठवाडा आणि विदर्भात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमान ३३ ते ३६ अंशांपर्यंत असेल.
मधल्या पंधरवड्यात मात्र तापमान ३४ ते ३६ अंशांदरम्यान सामान्य असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम