भुसावळ नजीम बानो ६ वर्षानी केरळ स्नेहालय सायको सोशलच्या मदतीने परतल्या घरी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | भुसावळ शहरातील २०१६ मध्ये शिवाजी नगरातून नजीम बानो या मानसिक रुग्ण असलेल्या महिला हरवल्या होत्या. तर येवढ्या वर्षीनी केरळातील कासरगोड भागात आढळल्या होत्या. पॉली दास, समुपदेशक, स्नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटर केरळ यांनी मदत केली आहे.

केरळ येथील स्नेहालय सायको सोशल रिहॅबिलिटेशन सेंटर, पोलिस व शहरातील सुभाष पाटील यांच्या मदत घेतली. तब्बल पाच वर्षांनंतर पुनर्वसन केंद्राच्या पॉली दास यांनी शुक्रवारी नजीम बानो यांना नातेवाइकांच्या स्वाधीन केले. तर शहादा येथील बेपत्ता मानसिक रुग्ण महिला रंजना पवार यांनाही नातेवाइकांकडे सोपवले.नजीम बानो या गतीमंद, मानसिक रुग्ण असल्याने सन २०१६ मध्ये घरुन निघून गेल्या होत्या, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. अनेकवेळा शोध घेवूनही त्या सापडल्या नव्हत्या. शहादा येथील रंजना पवार या सन २०१४ पासून बेपत्ता असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले.

या महिला केरळमध्ये सापडल्या केरळातील रेल्वे पोलिसांनी काही दयनीय अवस्थेतील आजारी महिलांना पुनर्वसन केंद्रात भरती केले होते. तेथे मेडिटेशन व औषधोपचार झाल्यानंतर महिलांची प्रकृती घराचा पत्ता सांगण्यापर्यंत सुधारवण्यात आले. यातील एक महिला राईबाई हिने परभणी जिल्ह्यातील बोरीचा उल्लेख केल्याने स्नेहालयाच्या पॉली दास या स्वयं-सेविकेने शोध सुरु केला.

यात भुसावळातील व सध्या तळेगाव दाभाडे येथे वास्तव्यास असलेल्या सुभाष पाटील यांनी मदत केली.तर परभणीतील महिलेला नातेवाइकांकडे सोपवल्यानंतर शुक्रवारी भुसावळातील शिवाजी नगरातील नजीम बानो व शहादा येथील रंजना पवार यांना सोबत घेत पॉली दास यांनी सचखंड एक्स्प्रेसने भुसावळ गाठले. भुसावळ शहरामध्ये नजीम बानो यांना भाऊ रईस खान व वहिनी रुकैय्याबानो खान यांच्या हवाली केले. तर रंजना पवार यांना नातेवाइकांकडे सोपवले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like