अमळनेरातून निघाली महिलांची शेगाव वारी 100 पेक्षा जास्त सहभाग दिसून आला…
खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | अमळनेर शहरातील जीएम सोनार नगर येथील संत गजानन महाराज संस्थानातर्फे गुरुवारी महिला भाविकांची पायी अशी वारी शेगावला रवाना झाली. ही शेगाव वारी 24 फेब्रुवारी ते 4 मार्च पर्यंत होणार असून या वारीचे ज्योती पवार यांनी आयोजन केले आहे. त्या दरम्यान मोठ्या संख्येने या वारीत महिलांचा सहभाग दिसून आला.
सकाळी पाच वाजता संत गजानन महाराज यांची आरती करण्यात आली त्यानंतर महिला भाविकांच्या या पद वारीला सुरुवात झाली भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करत असे रांगोळ्या काढत या याचे स्वागत करण्यात आले.
या वारीमध्ये ठिकाणी वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता भोजन आणि मुक्कामाची व्यवस्था केली गेली आहे तसेच वारीमध्ये अमळनेर, डांगरी ,सात्री ,भिलाली, सबगव्हाण, कामपिंपरी, खापरखेडा, करखेडा, मुसळी, धरणगाव या गावातील महिलांचा जवळपास मोठ्या संख्येने सहभाग दिसून आला आहे.
यादरम्यान तुळशीपूजा सुवर्णा साळुंखे ,विनादारी सरला चव्हाण, वारी प्रमुख ज्योती पवार, वैद्यकीय सेवा पुरवणारे डॉ. जिजाबराव पाटील ,प्रवीण पवार, हिराबाई पाटील, उर्मिला जगताप, वंदना शिसोदे ,श्रीकृष्ण चव्हाण, लहू कांत पाटील, नितीन भावे रघुनाथ पाटील यांचाही प्रमुख सहभाग होता.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम