महाशिवरात्री निमित्त पाहू आजचे राशिभविष्य

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १  मार्च २०२२ | वर्षातला आज मोठा आणि पवित्र दिवस महाशिवरात्र. श्री शिव पार्वती विवाहाच्या या मंगल दिनाच्या सर्व भाविकांना अनेक शुभेच्छा.

मेष : कौतुकास्पद कार्य कराल, आरोग्य उत्तम असेल, कुटुंबाला वेळ द्याल, सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल, व्यावहारिकदृष्ट्या लाभदायक दिवस.

वृषभ : धार्मिक उपासना आवश्यक आहे, नियमांचे पालन आवश्यक आहे, सरकारी कामांना प्राधान्य द्या, निर्णय घेताना घाई नको.

मिथुन : उष्णतेचे विकार बळावतील, संभ्रमावस्था होईल, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, वरिष्ठांशी मतभेद होतील, संयमाने वागावे

कर्क : कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल.सामंजस्याने प्रश्‍न सोडवाल, आपापसात सुसंवाद साधाल.व्यावसायिकांना लाभदायक दिवस

सिंह : सज्जनांचा सहवास लाभेल. शत्रूंवर मात कराल, हितचिंतकांकडून सहकार्य लाभेल, नोकरदारांसाठी जबाबदारी वाढेल.

कन्या : गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. प्रेम-प्रकरणांमध्ये अपयश संभवते. वाद-विवादापासून दूर राहावे, आरोग्याच्या तक्रारी संभवतात.

तुळ : जमिनींच्या कामांमध्ये अडचणी येतील, नावलौकिक सांभाळावा लागेल, वाहने सावकाश चालवावीत. आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक दिवस.

वृश्‍चिक : मित्रमंडळींबरोबर दिवस आनंदात जाईल. आत्मविश्‍वास निर्माण होईल. व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल.

धनु : वादग्रस्त विधानामुळे त्रास होईल, शब्द मागे घ्यावा लागेल, अनावश्यक खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे, आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक जबाबदारी वाढेल.

मकर : प्रसन्नता लाभेल, आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल, मनासारख्या घटना घडतील, कृतज्ञता व्यक्‍त कराल, व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.

कुंभ : वात-पित्ताचे त्रास होतील, मानसिक व आर्थिक ताणतणाव निर्माण होतील, आत्मचिंतनाची गरज, कोणालाही जामीन राहू नका.

मीन : मित्रमंडळींच्या सहवासाने आनंददायी दिवस जाईल. वैवाहिक समस्यांचे निराकरण होईल, आर्थिक प्रगती होईल.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like