महाशिवरात्री निमित्ताने सोने चांदीचा आजचा दर जाणून घ्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

गेल्या आठवडय़ात सोन्याचे दर वधारले होते.आता आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,०१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,३४० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. सोन्याचे दर प्रतितोळा ६० हजारांची पातळी गाठू शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.गेल्या आठवडय़ात रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे सोन्याचे दर वाढले.

रशिया-युक्रेन संघर्षांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीवर दिसून आला. जळगाव सराफ बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. सोने तब्बल ११९० रुपयाने महागले होते. तर चांदी १४८० रुपयांनी महागली होती.

गेल्या आठवड्यात सोने जवळपास १५०० ते १६०० रुपयाने महागले होते. त्याचबरोबर चांदीत २५०० रुपयाची वाढ दिसून आलीय. दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सोने लवकरच ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like