महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे आजचे दर काय? वाचा सविस्तर
खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी दरवाढ होत आहे. महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. राजकारणासोबत अर्थकारणावरही याचे पडसाद उमटताना दिसत आहे.
सध्या देशातील ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ७ तारखेला शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होईल. त्यानंतर १० मार्चला निवडणुकीचा निकाल लागेल. यानंतर इंधनाचे दर वाढू शकतात. खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे दर दिवसागणिक वाढत आहेत. रशिया आणि युक्रेनच्या संघर्षामुळे खनिज तेलाचे दर वाढले आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम