भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | जळगाव-भुसावळ महामार्गावर बुलेट शोरूमसमोर रविवारी रात्री भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुःख घटना घडली. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हिंगोणा, ता.सागर राणे नोकरीनिमित्त जळगावात राहत असून शनिवारी (ता. २६) सायंकाळी तो दुचाकीने हिंगोणा येथे घरी भेट देऊन पुन्हा दुचाकीने परत जळगावला येत होता. जळगाव-भुसावळ मार्गावरील बुलेट शोरूमच्या समोरून रात्री साडेबाराच्या सुमारास शहरात येत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.

या धडकेत सागर जागीच ठार झाला. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालयात आणला. त्यानंतर शवविच्छेदन करून नातेवाइकांकडे मृतदेह देण्यात आला.

एकुलता एक मुलगा गेल्याने राणे कुटुंबीयांनी आक्रोश केला. शरद रमेश जावळे वय वर्षे ४६, रोझोदा, ता. रावेर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी अधिक तपास करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like