शहरात 80 हजारांच्या दुचाकी वाहनांची चोरी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | शहरात सातत्याने दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची अपेक्षा आहे. जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परीसरातून एका तरुणाची 80 हजार रुपये किंमतीची महागडी दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.

जळगाव शहरातील गोलाणी मार्केटात अजय सुनिल शिंदे 27, रा.आव्हाने, हा तरुण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. रविवार, 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास अजय हा दुचाकी (एम.एच.19 डी.यू.5034) क्रमांकाच्या दुचाकीने जळगावच्या शहरातील गोलाणी मार्केट भागातील गायत्री फुल भंडारजवळ दुचाकी लावली .

कामाकरता गाडी लावून निघून गेला असता . काही वेळेतच चोरट्यांनी दुचाकी लांबवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक योगेश बोरसे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like