एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 105 रुपयांची वाढ
खान्देश लाईव्ह | १ मार्च २०२२ | सरकारी तेल कंपन्यांनीही 5 किलोच्या छोट्या एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 105 रुपयांची वाढ झाली आहे.
सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आजपासून म्हणजेच 1 मार्च 2022 पासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. तेल कंपन्यांनी सांगितले की, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 105 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. नवीन दर आजपासून लागू झाले आहेत.
या वाढीचा भार हॉटेल-रेस्टॉरंटवर पडणार असून त्याचा फटका ग्राहकांना बसनार आहे. कंपन्यांनी 1 फेब्रुवारी रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी केली होती. ग्राहकांना आता 569 रुपयांना मिळणार आहे. तथापि, कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम