जळगाव जिल्ह्यातील अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे जागा
खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | जळगाव जिल्ह्यातील बहुतांश अंगणवाड्या मोकळ्या जागेवर भरविल्या जात होत्या तर काही अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत हक्काच्या इमारती नसल्याने या परिस्थितीला सामोरे जावे लागत असे. परंतु जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती मिळणार आहे.
जळगाव जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत या वर्षी १०८ अंगणवाडी जिल्ह्यातील तब्बल १०८ अंगणवड्यांच्या इमारतींचा प्रश्न सुटला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्राधान्यक्रमानुसार अंगणवाडी बांधकामास प्रशासकीय मान्यता दिली आहे. जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात तीन हजार ४३८, तर जिल्हा परिषदेअंतर्गत शहरी भागात २०३ अशी एकूण तीन हजार ६४१ अंगणवाडी केंद्रे सुरू आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी ही गावातील महिला आणि बालविकासाचे केंद्र व्हावे या दृष्टीने कामकाज व्हावे व संबंधित अभियंत्यांनी मुदतीत आणि दर्जेदार कामे करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.बालकांचा शारीरिक आणि मानसिक विकासाचा पाया मजबूत करण्याचे काम अंगणवाड्या करीत आहेत. जिल्ह्यात उरवरीत अजूनही ३७६ अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती नाहीत. त्यामुळे उर्वरित अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी आगामी तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने शंभर टक्के निधी मंजूर करून अंगणवाड्यांसाठी स्वतःच्या इमारती मिळून दिली जाईल.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम