एकाच दिवसात सोने चांदीच्या दरात मोठी घसरण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | रशिया आणि युक्रेनमधील संकटामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. नजीकच्या भविष्यात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे. आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी मागील व्यवहाराच्या दिवसाच्या तुलनेत स्वस्त झाली.

जळगाव नगरीत आज सोन्याचे दर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,913 रुपयांवर गेला आहे, तर एक किलो चांदी 64,809 रुपयांना विकली जात आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 648 रुपयांनी घसरला आहे. सोन्याच्या मागणीत वाढ झाली असल्याचं दिसून आले आहे. अचानक वाढता दर स्थिरावला आहे.

शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे, रशिया- युक्रेन युद्ध, कच्च्या तेलाचे दर, जागतिक बाजार आणि शेअर बाजाराचा सोन्याचांदीच्या दरावर परिणाम होतो. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव आज 50,895 रुपये आहे. चांदीच्या किंमतीतही तब्बल 1,418 रुपयांनी मोठी घसरण झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 64,613 रुपये आहे. गेल्या काही वर्षांत सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

सोन्याच्या किमतीमध्ये मागील काही दिवसात चढ-उतार सुरु आहे. भारतीय सराफा बाजारात, जिथे २४ फेब्रुवारी रोजी सोन्याच्या किमतीत जोरदार झेप घेतली गेली. रशिया आणि युक्रेनमधील संकटामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. जगभरातील शेअर बाजारातील प्रचंड अस्थिरता आणि अन्य कारणे पाहता ते सोन्याकडे वळतील. परंतु रशिया – युक्रेन युद्धामुळे सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव एका दिवसानंतर जमिनीवर

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like