जाणून घ्या आजचे राशिभविष्य, कसा आहे आजचा दिवस

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २६ फेब्रुवारी २०२२ | मेष :- विचारांना दिशा देणारा विचार जवळचे लोक देतील. आत्मविश्वास कायम ठेवा. धंद्यात आळस करू नका.

वृषभ :- तुमचा प्रभाव सर्वत्र वाढेल. खाण्या-पिण्याची काळजी घ्या.

मिथुन :- खचून जाऊ नका. रागावर ताबा ठेवा. खाण्याचे तंत्र सांभाळा. वरिष्ठांचा विचार ऐकून घ्या.

कर्क :- आज ठरविलेल्या भेटीत व चर्चेत यश मिळेल. तुमचा प्रभाव दिसून येईल. कल्पनाशक्ती वाढेल.

सिंह :- शत्रूला वश करण्यात यश मिळेल. नवा परिचय उत्साहवर्धक ठरेल. कोर्टाचे काम होईल.

कन्या :- धंद्यात हलगर्जीपणा करू नका. फायदा होईल. जवळच्या व्यक्तींचा विचार ऐकून घ्या. दिशा मिळेल.

तूळ :- दडपणाखाली रहाल. अचानक कुणीतरी तुम्हाला दुखावण्याची शक्यता आहे. नम्रपणा सोडू नका.

वृश्चिक :- आजचे काम उद्यावर टाकू नका. मित्र मदत करतीलच असे गृहीत धरू नका. सहाय्य मात्र मिळेल.

धनु :- कामाचा व्याप वाढेल. तुमच्यावर टीका केली जाईल. क्षुल्लक कारणाने वाद वाढू शकतो.

मकर :- दुसर्‍यांचे विचार ऐकून घ्या. त्यातूनच तुम्हाला नवा मार्ग सापडेल. गुप्त कारवायांना रोखता येईल.

कुंभ :- तुम्ही घेतलेले श्रम सत्कारणी लागतील. तुमच्या कामाचा मोबदला अथवा श्रेय मिळेलच असे नाही.

मीन :- वर्चस्व वाढेल. धंद्यात सुधारणा होईल. कामगार चांगले काम करतील. आनंदी रहाल.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like