बोरगाव बुद्रूक परिसरात चोरट्याने केली दुचाकीची चोरी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २५ फेब्रुवारी २०२२ | शहरात मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढले असून मोठी गॅंग कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. जळगाव येथील बोरगाव बुद्रूक येथून अज्ञात चोरट्याने रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या हिरो कंपनीची एचएफ डिलक्स दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी येथील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रूक येथून चत्रभुज सुभाष गव्हाणे यांची २० हजार रुपये किंमतीची (क्र.एम.एच.१९-सी.के.४२९०) हिरो कंपनीची दुचाकी १० रोजी रात्री ११.३० वाजता ते ११ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरून नेली. चोरट्यांना पोलिसांचे कोणतेच भय राहिलेले नाही. त्यामुळे सामान्य नागरिक वैतागला आहे. शहरात चोरटे धुमाकूळ घालत असतानाच ग्रामीण भागातही सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे.

याप्रकरणी बोरगाव बुद्रूक येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड काॅन्स्टेबल संतोष थोरात करत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like