मोदींच्या भाषणावर एकनाथ खडसेंची खोचक टीका
खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही खोचक टोला लगावला आहे. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसवर हल्ला चढवल्यानंतर राज्यातल्या महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदींवर आणि भाजपवर टीकेची झोड उडवली आहे.
देशाला दिशा न दाखवता 60 मिनिटांच्या भाषणात 50 मिनिटं फक्त काँग्रेसवर टीका त्यांनी केली. हे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्याकडून राज्याबाबत भेदभाव होत आहे, असा आरोप खडसेंनी केला आहे.महाराष्ट्रामुळे कोरोना वाढला हे मोदीजीं चे वक्तव्य म्हणजे खेदाची बाब आहे. पाकिस्तानमधून अतिरेकी येत आहेत ते थांबले नाहीत मोदींना असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच मागच्यावेळी गोवा निवडणुकीचे चित्र वेगळे होते.काँग्रेसने कोरोनात मजुरांना तिकीटं देऊन कोरोना पसरवल्याचा थेट आरोप राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी केला. यावर बोलताना खडसे यांनी टोला लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जमीन लुटण्याच काम केलं या भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या आरोपावरून चंद्रकांत पाटलांना खेडसेंनी खुलं आव्हान देऊन टाकलं आहे. चंद्रकांत दादा त्यांच्या अनुभवातून बोलले असतील. मीही विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले. मी नेहमी पुराव्यानिशी बोललो. माझे चंद्रकांत पाटलांना आव्हान आहे त्यांनी पुराव्यानिशी बोलावे, असेही खेडसे म्हणाले आहेत.
गोव्यात इतर पक्षाच्या कुबड्या घेऊन भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी काम करत होता. यावेळेस इतर पक्षाचा जोर गोव्यात जास्त आहे. भाजप विषयी नाराजी आहे. उत्पल पर्रीकरांनना तिकीट त्याचा निवडणुकीवर निश्चित परिणाम होईल, असे भाकितही खडसेंनी केले आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम