कुत्रा मारल्याच्या संशयावरून दोन गटात भांडण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथे पाळीव कुत्र्याला मारून टाकल्याच्या संशयावरून मारहाण केल्याप्रकरणी झालेल्या दंगलीत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पहिल्या फिर्यादीत मालताबाई सोपान धायडे यांनी संशयित आरोपी सविता कुलकर्णी व दिक्षा कुलकर्णी दोघे रा.चिंचखेडा बु.तसेच सागर गुलाबराव पाटील रा.महालखेडा व त्यांचे सोबत आलेल्या दहा-पंधरा साथीदारांनी दि ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कुलकर्णी यांचा पाळीव कुत्रा मारुन टाकला या संशयावरून लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यात मालताबाई यांचा मुलगा सतिश सोपान धायडे,सुन पुजा सतिश धायडे,देवराणी निर्मलाबाई समाधान धायडे,व चुलत सुन ज्योती जितेंद्र धायडे या सर्वांना धमकावत जबर मारहाण केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत वरील चार आरोपीसह अज्ञात १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पो.हेड काॅ.विनोद श्रीनाथ करत आहे.

तर दुसर्‍या फिर्यादीत फिर्यादी सौ. सविता उदय कुलकर्णी (वय 50) व्यवसाय अंगणवाडीसेविका राहणार चिंचखेडा बुद्रुक हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, फिर्यादी यांनी पाळलेला कुत्रा मयत झाल्याबाबत आरोपी सतीश सोपान धायडे यास बोलण्यास केल्याच्या कारणावरून आरोपी सतीश सोपान धायडे, पूजा सतीश धायडे, मालती सोपान धायडे, निर्मला समाधान धायडे, ज्योती जितेंद्र धायडे, देविदास कीटकुल धायडे, अतुल समाधान धायडे, जितेंद्र समाधान धायडे यांनी फिर्यादी व तिच्या कुटुंबीयांना आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकी देत.

शिवीगाळ केलीया घटनेतील साक्षीदार सागर गुलाबराव धायडे यांच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एम. एच. 19 सी. क्यू. 4253चे तसेच साक्षीदार सतीश पाटील राहणार तिवळी, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा यांच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीची गाडी क्रमांक एम. एच. 28 एबी 7872 असे दोन्ही वाहनांची तोडफोड करून नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील साक्षीदार सागर गुलाबराव पाटील याच्या ताब्यातील मोटारसायकल क्र.एम एच १९ सी क्यु ४२५३ चे तसेच साक्षीदार सतिश पाटील रा.तिवडी ता जळगांव जामोद यांच्या ताब्यातील अशोक लैलेंड कंपनीची बस क्र एम एच २८ एबी ७८७२ अशा दोंन्ही वाहनांची तोडफोड करुन नुकसान केले म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस नाईक प्रदिप पिंगळे करीत आहे.पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like