भुसावळ बसस्थानकावर वाढली प्रवाशांची वर्दळ

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | राज्य परिवहन (एसटी) महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून एसटी संप सुरू आहे. वेतन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामावर यावे; तसेच विलीनीकरणाबाबत उच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. काही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत तर काही कर्मचारी कामावर परतल्याने बससेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यात भुसावळ-जळगाव मार्गावर दिवसभरात ३० बसेस धावत आहे. शिवाय भुसावळातून रावेर, मुक्ताईनगर, बऱ्हाणपूर आगाराच्या बसेस ये-जा करत असल्याने प्रवाशांची काळजी कमी झाली आहे.

भुसावळात यांत्रिक विभागातील कर्मचारी वगळता ७ चालक व १२ वाहक कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे भुसावळ आगारातून औरंगाबाद, धुळे, अमळनेर, रावेर, मुक्ताइनगर, बाेदवड व पाचोऱ्यासाठी काही फेऱ्या सुरू झाल्या. औरंगाबाद व धुळे आगाराच्या बसेस भुसावळात येत असल्याने औरंगाबादला जाण्यासाठी ८, धुळ्यासाठी दाेन गाड्या उपलब्ध आहेत. बाहेरील आगाराच्या गाड्या देखील व्हाया भुसावळ जातात. त्यामुळे प्रवाशांना दीलासा मिळाला आहे.

औरंगाबाद मार्गावरील बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. पुण्याला जाणारे अनेक प्रवासी औरंगाबादपर्यंत, तर नाशिकला जाणारे प्रवासी धुळे बसचा आधार घेतात. कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास पुणे बसफेरी देखील सुरू केली जाणार आहे. भुसावळ बसस्थानकात आता प्रवाशांची वर्दळ वाढली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like