हृदय विकाराच्या झटक्याने कर्मचार्‍याचा बाथरूममध्ये मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | कंपनीत काम करीत असता कर्मचाऱ्यास हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. संजय रामदास माळी असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

संजय माळी हे उमाळा फाट्याजवळील स्पेट्रकम कंपनीत गेल्या १२ वर्षांपासून नोकरीला होते. सोमवारी दुपारी ३ वाजता ते ड्यूटीवर गेले. रात्री ७.३० वाजता कंपनीतील बाथरूममध्ये हृदयविकाराचा झटका आला त्यातच बाथरूमचा दरवाजा मधून बंद असल्याने बराच वेळ होऊनही ते बाहेर नाही आल्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आला. दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याचे कळता कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडून त्यांना बाहेर काढले.

माळी यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणत असताना कंडारी फाट्यावरच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. संजय माळी यांचा ड्यूटीवर असताना मृत्यू झाल्याने त्यांना तत्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली होती. त्यानुसार कंपनीने मृताच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा धनादेश दिला आहे. तसेच इतर लाभदेखील वेळेत देण्याचे आश्वासन देण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like