सलग तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ, चांदीत घट
खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | जळगाव सुवर्णनगरीत सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली आहे. आज सलग तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. यापूर्वीही कालच्या सत्रात सोने ३१० रुपयांनी तर चांदी तब्बल १२१० रुपयांनी वाधरली होती. आज १० ग्रॅम सोन्याच्या भावात २०० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी ३४० रुपये किलोने महागली आहे . सध्या भाववाढीने सोने पुन्हा पन्नाशीच्या दिशेने जाऊ लागले आहे.
सोन्या-चांदीच्या दराने पुन्हा एकदा भारतीय सराफा बाजाराची चमक वाढवण्यास सुरुवात केली आहे. जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९,५६० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६३,८३० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते. १ फेब्रुवारीला ६२,४१० रुपये किलो इतका होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे दोन्ही धातूंमध्ये हालचाल होत असल्याचे दिसून आले.
जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे भारतीय सराफात सोन्याच्या दरात मंगळवारी वाढ नोंदली गेली. सोन्याच्या भावात ५२० रुपयाची वाढ झाली आहे तर दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात मोठी वाढ दिसून आली. चांदी १६७० रुपयाची वाढ झाली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात २०० रुपया पर्यंतची घट दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात १२०० रुपयाची घट झाली आहे. मात्र चालू आठवड्यात सोन आणि चांदी दरात तेजी दिसून येतेय. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाण्याची शक्यता आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम