ब्रेक फेल झाल्याने दरीत कोसळला तांदळाचा ट्र्क

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२‎ वरील कन्नड घाटात औरंगाबादकडून, धुळ्याकडे जाणाऱ्या तांदळाच्या ट्रक घाटातील मल्हार गडाजवळील मेणबत्ती पॉइंटजवळ ब्रेक फेल झाल्याने ३०० फूट खोल असून प्रसंगावधान राखल्याने चालक आणि क्लिनर बचावले आहे. मात्र, अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी मदतकार्य केले, तसेच घाटातील वाहतूक सुरळीत केली.

मंगळवारी सकाळी तांदळाचा ट्रक क्रमांक ए.पी.२९-टी.व्ही.११६६ हा औरंगाबादकडून धुळ्याच्या दिशेने जात होता. ट्रक कन्नड घाटात युटर्नजवळ पोहचल्यावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याचे कळताच घाटातील मेणबत्ती पॉइंटजवळ चालकाने ट्रकवर नियत्रंण मिळवण्याचा प्रयत्न केला. पंरतु यश न आल्याने चालक व क्लीनरने वेळीच ट्रकमधून उडी घेतली, त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे.

महामार्ग पाेलिसांना दुचाकी चालकाने अपघाताची माहिती दिली. माहिती मिळताच महामार्ग पाेलिस केंद्राचे सहाय्यक निरीक्षक भागवत पाटील, उपनिरीक्षक सुनील पवार, हवालदार शामकांत साेनवणे, धनराज पाटील व अन्य पाेलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्यांना ट्रक दरीत कोसळलेला दिसून आला. तर चालक व क्लीनर भेदरलेल्या अवस्थेत आढळले. पाेलिसांनी त्यांना धीर दिला, तसेच वाहतूक सुरळीत केली.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like