लग्नासाठी मागे लागलेल्या तरूणीला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ०८ फेब्रुवारी २०२२ | तरुणीकडून लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय तरुणाने पुर्णा नदीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.

उंचदा, ता. मुक्ताईनगर अजय सिताराम इंगळे वय-२५ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी तरूणीवर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून अजयने सुमारास खामखेडा पुलाच्या पुर्णा नदीपात्रात उडी मारली. अजय सिताराम इंगळे हा मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच्या गावातील २८ वर्षीय तरूणी गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करावे अशी मागणी करत होती. त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे.

या लग्नास अजय याने नकार दिला होता.अजय सिताराम इंगळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताच्या भाऊ मनोज इंगळे यांच्या फिर्यादीवरून तरूणीवर मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like