नंदुरबार नगरपालिकेच्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण
खान्देश लाईव्ह | २९ ऑक्टोबर २०२२ | येथील नगरपालिकेच्या नुतन इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. दरम्यान, न.प.च्या इमारत बांधकामासाठी शासनाकडे ७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी प्रलंबित असल्याबाबत माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या भाषणात उल्लेख करताच ना.शिंदे यांनी व्यासपिठावरुनच मंत्रालयात मोबाईलद्वारे संपर्क करुन कार्यक्रम संपण्यापुर्वीच सदर निधी मंजूर केला.
येथील नगरपालिकेच्या नुतन इमारतीचे लोकार्पण आज मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. उद्घाटनानंतर त्यांनी इमारतीची पाहणी केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृहात उद्घाटनपर सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी व्यासपिठावर आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, खा.डॉ.हीना गावित, खा.राजेंद्र गावित, आ.राजेश पाडवी, आ.किशोर दराडे, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, आ.शिरीष नाईक, आ.काशिराम पावरा, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी, जिल्हाधिकारी मनिषा खत्री आदी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम