रोटरी क्लब जळगावतर्फे योगिता पाचपांडे यांचा गौरव

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २९ ऑक्टोबर २०२२ | प्रेम प्रकरणात पळवून नेलेल्या व त्यानंतर कुंटणखान्यात सोडलेल्या तरुणीची सुटका करणाऱ्या तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचारी योगिता पाचपांडे यांचा रोटरी क्लब जळगावतर्फे नुकताच गौरव करण्यात आला.

रोटरी क्लब जळगावच्या गणपती नगरातील सभागृहात आयोजित या सन्मान सोहोळ्याप्रसंगी मंचावर अध्यक्ष राजेश वेद, मानद सचिव गिरीश कुळकर्णी, कॅप्टन मोहन कुळकर्णी व डॉ. कीर्ती देशमुख होत्या.

प्रेम प्रकरणात फसवून पुणे येथील कुंटणखान्यात अडकून पडलेल्या जळगावच्या तरुणीला पाचपांडे यांनी अतिशय धाडसाने व चातुर्याने सोडविले. पाचपांडे यांनी जीवनाची घडी विस्कटलेल्या अनेक कुटुंबियांना सुखी संसाराचे महत्व समजावून सांगत, त्यांना एकत्रित आणले आहे. गेली ८ वर्षे समुपदेशनाच्या कौशल्याचा वापर करीत इतरांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्यासाठीचे कार्य पाचपांडे करीत आहेत. पतीच्या अपघाती निधनानंतर त्यांची अपूर्ण राहिलेली संसाराची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पाचपांडे यांनी पोलीस विभागात सेवा देण्यास सुरुवात केली. त्या सध्या तालुका पोलीस स्टेशन कार्यरत आहेत.
रोटरी क्लब जळगावच्या माजी अध्यक्ष पूनम मानुधने व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते योगिता पाचपांडे यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तत्पूर्वी मानपत्राचे वाचन गिरीश कुळकर्णी यांनी केले. योगिता पाचपांडे यांनी मनोगतात समाजातील परिस्थितीचे वर्णन केले व रोटरी क्लबने माझ्या कार्याची दखल घेतली याबद्दल धन्यवाद दिलेत. कार्यक्रमास रोटरी क्लबचे सदस्य मोठ्या संख्यने उपस्थित होते.

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like