कासोदा येथे घरफोडी ; अडीच लाखांची रोकड लांबविली
खान्देश लाईव्ह | २९ ऑक्टोबर २०२२ | बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरटयांनी डब्यात ठेवलेले अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे आज उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे . याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासोदा येथील किराणा दुकान चालविणारे विजय शिवाजी वारे यांच्या घराचे बंद असलेले कुलूप तोडत अज्ञात चोरट्यांनी दि. २८ रोजी घरात प्रवेशकरून स्वयंपाक घरत ठेवलेल्या डब्यात असलेली २ लाख ४० हजारांची रोकड लंपास केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी विजय शिवाजी वारे यांनी कासोदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सफौ.सहदेव घुले तपास करित आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम