अमृतसरच्या तरुणाची मित्रांनीच केली गळा चिरून हत्या

खान्देश लाईव्ह | २९ ऑक्टोबर २०२२ | अमृतसरकडे आपल्या मित्रांसह जाणाऱ्या एका तरुणाची गळा चिरून हत्या केल्याची धक्कदायक घटना भुसावळ शहरातील रेल्वे यार्ड परिसरात उघडकीस आली असून याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्याच्यासोबत असणाऱ्या चार मित्रांनी हि हत्या केल्याच्या संशय मयताच्या भावाने केला असून डेबिट कार्डवरून मयताची ओळख पटली आहे. मनमीतसिंग गुरूप्रीत सिंग (वय १९, रा. अमृतसर, पंजाब) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सूत्रांची माहिती अशी कि, मनमीतसिंग आपल्या पाच मित्रांसह बुधवार, २६ रोजी नांदेड-अमृतसर एक्स्प्रेसने अमृतसरकडे निघाला होता. मात्र डी – २ डब्यात पाच तरुणांचा एका प्रवाशाशी वाद झाल्यानंतर त्यांनी त्याला मारहाण केली होती.मारहाण झालेल्या प्रवाशाने सुरक्षा यंत्रणेशी संपर्क साधल्याने हे पाचही तरुण खंडवा मार्गावरील रेल्वे यार्डात उतरले व गुरुवारी सकाळच्या सुमारास मनमीतसिंगचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला. त्यामुळे सोबतच्या चारही मित्रांनीच हा खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार चारही संशयीतांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व्यक्तीजवळ डेबीट कार्ड होते. ते कार्ड पंजाब अँड सिंध या बॅकेचे होते, त्या कार्डावरून पोलिसांनी औरंगाबाद येथे त्या बँकेत चौकशी करून त्या कार्डावरून मृतदेहाची ओळख पटविली. शुक्रवारी सायंकाळी मृतदेहाची विच्छेदन करण्यात आले असून हा मृतदेह त्याचे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.खंडवा मार्गावरील यार्डात कॉर्ड लाईनवर गुरूवारी सकाळी १० वाजेपूर्वी मनमीतसिंग गुरूप्रीतसिंग या प्रवाशाचा मृतदेह सापडला होता.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम