रोपट्यांना पाणी देतांना शॉक लागून युवकाचा मृत्यू

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २९ ऑक्टोबर २०२२ | झाडांना पाणी देताना वायरला स्पर्श झाल्याने शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेरात घडली.  २८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.स्वप्नील मच्छीन्द्र पाटील वय २७ रा टाकरखेडा ता.अमळनेर असे मयत युवकाचे नाव आहे.

स्वप्नील हा सकाळी साडे अकरा वाजता टाकरखेडा अमळनेर रस्त्यावर गट नंबर १९४ व १९५ मधील शेतात असलेल्या नाश्त्याच्या हॉटेलच्या आवारात झाडांना पाणी देत असताना पाण्याच्या मोटरच्या कट झालेल्या वायरवर पाय पडल्याने त्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हेडकॉन्स्टेबल कपिल पाटील तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like