24 तलवारीसंह दोन तरुणांना अटक
खान्देश लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I मनमाड पोलिसांनी 24 तलवारीसंह दोन तरुणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. मनमाड शहर पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचार्यांनी मनमाड शहरातून दत्तमंदिर रोडवरील मोठा गुप्तसर गुरुद्वाराबाहेर लावलेल्या एका स्टॉलवरुन 23 अवैध तलवारी आणि एका तरुणाच्या ताब्यातून एक अशा एकूण 24 अवैध तलवारीचा शस्रसाठा जप्त केला. संदीप बाळासाहेब पवार (वडगांव पंगू, ता.चांदवड) व चरणसिंग भूपिंदरसिंग (27, न्यू कोट आत्माराम, सुलतानविंड रोड, अमृतसर) अशी अटकेतील आोपींची नावे आहेत.
पोलिसांनी 24 तलवारी व एक मोटारसायकल असा एकूण मुद्देमाल जप्तही केला असून मनमाड पोलिस उपअधीक्षक समीर सिंग साळवे यांनी म्हणाले की, दोघांना ताब्यात घेतले असून बेकायदेशीरपणे तलवार बाळगतांना आणि विक्री करतांना आढळून आल्याने दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त करण्यात आल्याने ह्या तलावारी कुठून आणल्या आणि त्याची विक्री कोणत्या हेतुने करण्यात येत होती याचाही तपास पोलिस यंत्रणांकडून करण्यात येईल.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम