दिनेश चव्हाण यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
खान्देश लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक अकादमीतर्फे दुसरे फुले आंबेडकर विचार राष्ट्रीय शिक्षक संमेलन धुळे शहरात 24 व 25 डिसेंबर रोजी होत आहे. या राष्ट्रीय संमेलनात चाळीसगाव येथील चित्रकार, कवी, साहित्यीक, शिक्षक दिनेश चव्हाण यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून मान्यवरांच्या हस्ते तो प्रदान करण्यात येणार आहे.
दिनेश चव्हाण यांचे कला क्षेत्रातील योगदान विस्तारलेले आहे. पोट्रेट, जलरंगातून त्यांची विशेष कला सर्वांना सुपरीचीत आहेच शिवाय ते कवी देखील आहेत, त्यांच्या कवितांना कथांना अनेक राज्यस्तरीय सन्मानही मिळालेले आहेत. महाराष्ट्रभरात त्यांचे कलेतून साहित्यकृतीना मुखपृष्ठ देखील प्राप्त आहेत, शिवाय अनेक सामाजिक, शैक्षणिक संस्थेना त्यांनी आपल्या कल्पकतेतून बोधचिन्ह देखील दिले आहेत. चित्रचारोळी व फलक लेखन हे सदर सद्या त्यांचे सोशल मीडियावर खूप गाजत आहे. या राष्ट्रीय सन्मानाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम