रेल्वेतून ४६ हजारांचा ऐवज चोरला
खान्देश लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ Iमध्य प्रदेशातील बर्हाणपूर येथील दौलतराव पांडुरंग पाटील हे ट्रेन (क्रमांक 10444) नागपूर-पुणे स्पेशल गाडीने भुसावळ ते पुणे प्रवास करीत असताना भुसावळ स्थानक सुटल्यावर सीटवर ठेवलेली पर्स चोरट्याने लंपास केली.
पर्समध्ये दोन हजार रुपये रोख व 18 हजारांचा मोबाईल असा 26 हजार रुपयांच्या ऐवजासह अन्य साहित्य मिळून एकूण 46 हजार रुपयांचा मुद्देमाल होता. या प्रकरणी शुक्रवारी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार सुभाष पाटील पुढील तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम