धरणगावच्या एकाची १ लाख १९ हजारात फसवणूक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I फेसबुकवर ‘पतंजली’ योगा प्रशिक्षणाची बनावट जाहिरात टाकून त्या जाहिरातीच्या माध्यमातून धरणगावच्या एकाची १ लाख १९ हजारात फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दोन अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील हेमबिंदू नगरात किशोर मंगेश पाटील (वय ६०) हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. दि. ७ ऑगस्ट २२ रोजी किशोर पाटील यांना मो.नं.९४३३२७३०७२, ९७४८०६७०६९ यांनी फेसबुकवर पंतजली योगपिठ ट्रस्ट युनिट २ हरीद्वार उत्तराखंड या संस्थेला योगासन आणी प्राणायाम ७ दिवसाच्या प्रशीक्षण बाबत टाकलेली जाहीरात दिसली. सदर जाहिरातीत प्रशीक्षणासाठी पंतजली योगपिठ ट्रस्ट युनिट २ खात्याचा क्रं. १९०५१९०१९००५९६६५ टाकलेला होता. किशोर पाटील हे प्रशिक्षण करण्यास इच्छुक असल्यामुळे त्यांनी ‘फोन पे’द्वारे टप्याटप्याने एकूण १ लाख १९ हजार रुपये दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १.५९ वाजता दि. ८ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी २.२७ वाजेच्या दरम्यान वेळोवेळी टाकले. परंतु याबाबत संपर्क साधल्यावर पैसे परत करण्यास टाळाटाळ व्हायला लागली. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर किशोर पाटील यांनी मो.नं. ९४३३२७३०७२, ९७४८०६७०६९ धारकाविरुध्द कायदेशीर तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआहे अमोल गुंजाळ हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like