मुक्ताईनगरात चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध
खान्देश लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ Iउच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोर पुरुषांबद्दल केलेल्या वक्तव्याचा बहुजन समाज बांधवांतर्फे मुक्ताईनगरात निषेध करण्यात येत असून जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे.
समस्त बहुजन समाजातर्फे मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकामध्ये चंद्रकांत पाटलांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात सुधाकर बोदडे, मोहन मेढे, रवींद्र बोदडे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे रमेश बोदडे, बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक प्रमोद सौंदळे, सचिन झनके, राजू बोदडे, संजय माळी, गणेश माळी, प्रल्हाद माळी, प्रमोद माळी, प्रकाश माळी, ज्ञानेश्वर माळी, किशोर माळी, सुरेश माळी, भूषण वानखेडे, अमर बोदडे, विवेक बोदडे, काँग्रेसचे बि.डी. गवई, निलेश भालेराव, एडवोकेट गौतम इंगळे, राहुल गणेश आणि असंख्य बहुजन समाज बांधव उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम