पाचोऱ्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह I १० डिसेंबर २०२२ I राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थोर पुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ आज १० डिसेंबर रोजी पाचोरा येथील अ. भा. महात्मा फुले समता परिषद व सर्व सामाजिक संघटनांतर्फे तिव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

शहरातील कृष्णापुरी येथुन चंद्रकांत पाटील यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून धत्रपती शिवाजी महाराज चौकात चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत तिव्र निषेध जाहिर करण्यात आला. तसेच निषेधार्थ निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ९ डिसेंबर रोजी एका सभेत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या थोर पुरुषांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असुन चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ आज १० डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता कृष्णापुरी येथुन छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत चंद्रकांत पाटील यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी “या चंपाबाईचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय, “चंद्रकांत पाटील हाय हाय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोळे मारत पुतळा फुंकण्यात आला. तसेच निषेधार्थ निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. सदरचे निवेदन नायब तहसिलदार भागवत पाटील यांनी स्विकारले.

याप्रसंगी समता सैनिक दलाचे किशोर डोंगर, अ. भा. महात्मा फुले समता परिषदेचे शहर अध्यक्ष कन्हैया देवरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचे सुनिल शिंदे, आर. पी. आय. चे शशिकांत मोरे, नगरसेवक वासुदेव महाजन, अशोक मोरे, सुदर्शन महाजन, विनोद खरे, संतोष महाजन, जिभु पाटील, चिंधु मोकळ, हरिष आदिवाल, मधुकर महाजन, अनंत बागुल, के. एस. महाजन, नाना महाजन, बबलु महाजन किशोर बारावकर, गोविंदा अहिरे, ज्ञानेश्वर महाजन, आनंदा महाजन, आबा महाजन, चिंतामण जाधव, शांताराम खैरे, नथ्थु महाजन, नितीन महाजन, कमलाकर महाजन, अशोक निंबाळकर, चेतन महाजन, भगवान महाजन, विठ्ठल महाजन (माऊली), भागवत महाजन, रघुनाथ महाजन यांचेसह अ. भा. महात्मा फुले समता परिषदे व सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like