गुरूपौर्णिमेच्या निमीत्ताने ढोकरीत वृक्षारोपण

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह । १५ जुलै २०२२ । गुरूपौर्णिमेचे औचित्य साधुन श्री काशी विश्‍वनाथ ध्यान मंदिर देवस्थान च्या वतीने अंबिकानगर (ढोकरी) येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर गुरूदर्शनाचा भव्य सोहळा देखील संपन्न झाला. यावेळी ह.भ.प. शिंगोटे महाराज यांनी उपस्थित मान्यवरांना गुरूचरित्र अध्याय पुस्तिका व गुलाबपुष्प देऊन सन्मानित केले.

सध्या निसर्गाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. वृक्षतोड होत असल्याने निसर्गाचा समतोल ढासाळतो. अशा काळात ढोकरी ग्रामस्थ व ह.भ.प.शिंगोटे महाराज यांनी वृक्षारोपणाचा राबविलेला उपक्रम अतिशय स्त्युत्य व वाखाणण्याजोगा असल्याचे प्रथितयश व्यापारी अनिल कोळपकर यांनी सांगितले. तर सरपंच सौ.बेबीताई शेटे यांनी गुरूपौर्णिमेच्या दिवशी लावण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी ढोकरी ग्रामस्थ निश्‍चित घेतील असा विश्‍वास व्यक्त केला.

सुवर्णकार राजेंद्र मैड म्हणाले कि आज गुरूपौर्णिमेनिमीत्त आयोजीत कार्यक्रमासाठी आम्हाला बोलाविले. या कार्यक्रमात आम्हाला गुरूंचे आशिर्वाद तर मिळालेच परंतु, त्याचबरोबर आमच्या हस्ते वृक्षारोपण करण्याची संधी दिली, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. या उपक्रमाबाबत त्यांनी ढोकरी ग्रामस्थांचे अभिनंदन करून आभार मानले.

कार्यक्रमास मधुकर डहाळे, राजेंद्र होंडा चे व्यवस्थापक विनोद वाकचौरे, अमोल शिंदे, ग्रामअधिकारी सौ.कांचन जोरवर, कृषी सहाय्यक सौ.दातीर, श्री संत ज्ञानेश्‍वर विद्यालय, ढोकरीच्या मुख्याध्यापिका सौ. जया पोखरकर, वाळुंज सर, अशोक शेटे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक करवर सर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बाबाजी पुंडे, सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन राम करवर, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते कवी ज्ञानेश पुंडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार कवी ज्ञानेश पुंडे यांनी मानले.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like