निसर्गाच्या सानिध्यात अनुभवली रायसोनी वंडर किड्सच्या विध्यार्थ्यानी रम्य ‘सकाळ’ !

खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | पक्ष्यांचा किलबिलाट… गाईंचा हंबरडा आणि सोबत सूर्याची कोवळी किरणे झेलत जी. एच. रायसोनी वंडर किड्सच्या विध्यार्थ्यानी कुसुंबा येथील अहिंसा तीर्थ तथा रतनलाल सी. बाफना गोसेवा अनुसंधान केंद्रामध्ये २६ एकरवरील निसर्गाची सफर केली. २३०० गाईंचे संगोपन, झाडे, वेली, पशु-पक्षी, जैविक शेतीसह दूध, तूपनिर्मिती, शेणापासून सेंद्रिय खत, दंतमंजन, शाकाहार प्रसार व येथील जैवविविधता पाहून सर्व लहानग्याची मने प्रफुल्लीत झाली. निमित्त होते जी. एच. रायसोनी वंडर किड्सतर्फे शनिवारी ता. ५ रोजी आयोजित केलेल्या कुसुंबा येथील अहिंसा तीर्थ शिवारभेटीचे.
सुरवातीला रायसोनी वंडर किड्सच्या नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजी च्या विध्यार्थ्यांसह स्कूलच्या शिक्षकाचे येथे स्वागत करण्यात आले. यानंतर येथील विविध संत, महा पुरुषांच्या प्रतिमा पाहत येथील स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांना राठी, साहिवाल, गीर, कांकरेज, खिल्लार आणि गावठी गाईंचे संवर्धन दाखविले. यावेळी २३०० हून अधिक गायींची आयुष्यभरासाठी घेतली जाणारी काळजी बघून सर्व लहानगे विद्यार्थी गोशाळा व्यवस्थापनासमोर नतमस्तक झाले. या शैक्षणिक सहलीमध्ये १०४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या एक दिवसीय शैक्षणिक सहलीसाठी शिक्षिका नेहा शिंपी, तस्नीम टंकरवाला, निकिता जोशी, नेहा चिंचोले, मयुरी वालेचा, आरती पाटील, निधी खडके, रिंकू लुल्ला, सोनिया शर्मा, नेहा शिंपी, दिपाली कुलकर्णी आदींसह पालक व स्कूल कमिटी सदस्य यांचे मागदर्शन लाभले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी व मुख्याध्यापिका तेजल ओझा यांनी अभिनंदन केले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम