शालिमार एक्स्प्रेसच्या पार्सल बोगीला आग ; लाखोंचे नुकसान

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | नाशिकरोड रेल्वे स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या शालीमार एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागल्याची घटना घडली असून या आगीत लाखोंचे नुकसान झाले.

नाशिक रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर ही आग लागली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. या आगीमुळे रेल्वेची काही काळवाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, शालीमार एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आल्यावर वायरमन व मोटरमन यांच्या आग लागल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच रेल्वे पोलीस, आरपीएफ आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like