भारत जोडो यात्रा निमित्त पाचोरा येथे उद्या काँग्रेसची बैठक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होतअसून या यात्रेत पाचोरा शहरातील व तालुक्यातील मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग राहणार आहे याबाबत चर्चा करण्यासाठी पाचोरा काँग्रेसने दि. ६ नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन शहरातील शासकीय विश्रामगृहात दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे.

बैठकीत प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार भारत जोडो यात्रेचे जिल्हा समन्वयक माजी जिल्हाध्यक्ष अॅड संदिप पाटील, जिल्हा सरचिटणीस जमिल शेख आदी उपस्थितीत राहणार आहे. बैठकीत राहुल गांधी यांनी पायी सुरू केलेल्या कन्या कुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी शहर व तालुक्यातुन असंख्य युवकांसह नागरिक उत्सुक आहेत. ६ नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात येत आहे यात्रेत जळगाव जिल्ह्य़ातील लोकांचा सहभाग दि. १८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शेगाव येथील होणाऱ्या राहुल गांधी यांच्या विराट सभेत होणार आहे.या यात्रेत सहभागी होण्यासाठी बैठकीत शहर व तालुक्यातुन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण यांनी केले आहे.

 

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like