यावल येथे ५२ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | एका ५२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील धनगरवाडा परिसरात राहणाऱ्या उघडकीस आली असून याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . राजेंद्र गंगाधर कचरे असेमयताचे नाव आहे .
मजुरी करणारे राजेंद्र कचरे यांनी दि. ५ नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबासह घरात झोपले असता त्यांनी धनगरवाडयातील स्वस्त धान्य दुकानाच्या मागील बाजुस असलेल्या निंबाच्या झाडाला दोरी गळफास घेत आत्महत्या केली . रात्री २ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शोभाबाई कचरे यांना गळफास घेतल्याचा प्रकार दिसून आला. धनराज कचरे यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे पुढील तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम