पत्नीसह सासूला मारहाण करणाऱ्या पतीविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
खान्देश लाईव्ह | ५ नोव्हेंबर २०२२ | पत्नीला लाथाबुक्क्यानी मारहाण करून शिवीगाळ करत सासूच्या डोक्यात वीट मारून तिलाही जखमी केल्याची घटना जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथे घडली असून . याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिस शरीफ बिस्ती (वय २५, रा. पोलीस कॉलनी,जळगाव) कौटुंबिक वादातून त्यांची पत्नी माहेरी गेल्याने अनिस शरीफ बिस्ती हा पत्नीच्या घरी 4 नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजता गेले . दोघांमध्ये वाद झाला. या वादातून अनिस बिस्ती याला राग आल्याने त्याच्या पत्नीला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच बाजूला पडलेली वीट सासूच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली.
याप्रकरणी सासू ज्योती प्रकाश ठाकूर रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव यांच्या फिर्यादीवरून जावई अनिस बिस्ती याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ संजय धनगर पुढील तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम