महाराष्ट्राला राज्यगीत मिळणार ; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
खान्देश लाईव्ह | १८ ऑक्टोबर २०२२ | महाराष्ट्र राज्याला लवकर राज्यगीत मिळणार असल्याची घोषणा राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सर्वांच्या तोंडी बसलेले सुप्रसिध्द गीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्यगीताचा दर्जा म्हणून निवड करण्यास एकमत झाले आहे.
महाराष्ट्राच्या राज्यगीतासाठी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची निवड करण्यात आली आहे. कॅबिनेट राज्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली असून या गीतामधील दोन कडवी घेतली जाणार असल्याची माहिती प्रसार माध्यमांशी बोलतांना केली आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम