जळगावातील खून प्रकरणातील फरार तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २९ ऑक्टोबर २०२२ | शहरातील शिरसोली नका येथे फटाके फोडण्याच्या वादातून एकाच खून करून फरार असणाऱ्या तीन आरोपींच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.

शिरसोली नाका परिसरातील सदगुरू कॉलनीत २५ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फटाके फोडण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. वादानंतर मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी, सतकौर जगदीशसिंग बावरी, सोनुसिंग जगदीशसिंग बावरी सर्व रा. शिरसोली नाका,सदगुरु कॉलनी जळगाव यांनी वाद घातला. यात संतापाच्या भरात मोहनसिंग बावरी, मोनुसिंग बावरी, जगदीशसिंग बावरी यांनी मिळून संजयसिंग प्रदीपसिंग टाक याच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून करून पसार झाले. होते. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलीसांनी कोंबींग ऑपरेशन राबवून संशयित आरोपी मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, मोनुसिंग जगदीशसिंग बावरी, जगदीशसिंग हरीसिंग बावरी या तिघांना तांबापूरा परिसरातून अटक केली असून न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like