नशिराबादजवळ रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू

खान्देश लाईव्ह | २९ ऑक्टोबर २०२२ | रेल्वेखाली आल्याने एका अनोळखी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना २७ रोजी घडली असून याप्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे ऑफलाईन खंबा क्रमांक ४२८/ १०-१२ या रेल्वे रूळावर एका अनोळखी ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती रेल्वेचे अधिकारी शुभम विश्वकर्मा यांना गुरूवार २७ ऑक्टोबर रेाजी सकाळी ११ वाजता मिळाली. नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अतुल महाजन यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मृतदेह तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. दरम्यान मयताची कोणतीही ओळख पटलेली नसून ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोहेकॉ अतुल महाजन तपास करीत आहे.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम