जळगावात घरफोडी ; सव्वा लाखांचा ऐवज लंपास
खान्देश लाईव्ह | २९ ऑक्टोबर २०२२ | निसर्ग कॉलनीतील श्रीराम चौकातील एका घरातून अज्ञात चोरटयांनी १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील श्रीराम चौकातील निसर्ग कॉलनीतील रहिवासी दिपाली सतीश सोनवणे(वय ३३) यांचे घर ते बंद असल्याने दि २७ ते २८ रोजीच्या दरम्यान अनोळखीनी राहत्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागीने व रोकड रक्कम असा एकूण १ लाख २० हजार रुपयाचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिपाली सतीश सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला स.फौ.किरण पाठक तपास करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम