हिंगोणा येथे ५० वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २९ ऑक्टोबर २०२२ | यावल तालुक्यातील हिंगोणा येथील ५० वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बाळू उखा कोळी (वय ५० वर्ष)हिंगोणा ता. यावल असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा ते ७ वाजेच्या सुमारास बाळू कोळी यांनी हिंगोणा गावातील डोंगरहाळ या परीसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट होवु शकले नाही. याबाबत विलास कोळी यांच्या खबर दिल्यावरून फैजपुर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस उपनिरिक्षक आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. देविदास सूरदास , हे कँ. बऱ्हाटे हे करीत आहे. बाळु कोळी यांच्या पश्चात त्यांच्या कुंटुबात पत्नी एक मुलगी असा परिवार आहे .

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like