तुमच्या वादात ४० आमदारांना बदनाम करू नका -ना. गुलाबराव पाटील
खान्देश लाईव्ह | २९ ऑक्टोबर २०२२ |तुमच्या एका वादामुळे ४० आमदारांना बदनाम करू नका असे आमदार रवी राणा यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलेच खडसावले.
आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या वादावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रवी राणा यांनी जे वक्तव्य केले आहे ते अत्यंत चुकीचे आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. कोणी विकावू नाही. पण तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. असे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही, तर ही गोष्ट चुकीची होईल आणि लोकांमध्ये सभ्रम निर्माण होईल. ४० वर्षांचं करियर लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घाला,अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांना करतो, असेही ना. पाटील म्हणाले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम