एरंडोल येथे उभा असलेल्या ट्रकमधून ट्रकचे सामान चोरी
खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ |उभ्या असलेल्या ट्रकमधुन टायर,टायरडिस्क,डिझेल व बँटरी असा साडेअकरा लाखांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना एरंडोल येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगत न्यू इंग्लिश मेडीयम स्कूल नजिक असलेल्या पाटाच्या चारी जवळ उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई येथील GAE कार्गो मूव्हर्स चे संचालक प्रकाश रामशिरोमन पांडेयांच्या फिर्यादीनुसार ट्रकचालक जसवंत चंद्रीका यादव यानेच सदरील चोरी केल्याचा संशय व्यक्त केला आहे. ट्रक क्रमांक एम.एच.४३.बी.एक्स.१५५२ या ट्रकमध्ये ६०,००० रू. किंमतीचे ट्रक टायर,१५हजार रूपये किंमतीची बँटरी,२५हजाराच्या टायरडिस्क व १५०लिटर डिझेल होते. तपास हेड काँन्स्टेबल राजेश पाटील हे करीत आहेत.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम