उत्साही संवाद या विषयावर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा
खान्देश लाईव्ह | २८ ऑक्टोबर २०२२ | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाव्दारे उत्साही संवाद या विषयावर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा झाली.
दि.२१ ऑक्टोबर रोजी व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेत झालेल्या या कार्यशाळेत महेश वागळे यांनी उत्साही संवाद कसा करावा, संवाद साधतांना आपले विचार, भावना, कल्पना एकमेकांसोबत कसे मांडावे आदी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रशाळेच्या संचालक प्रा.मधुलिका सोनवणे हया अध्यक्षस्थानी होत्या. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.रमेश सरदार यांनी केले. विद्यापीठाने वालचंद पीपल्स फर्स्ट लिमिटेड सोबत केलेल्या करारांतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ९८ विद्यार्थी उपस्थित होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम