धुळे जिल्हा नियोजन समितीची उद्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | २७ ऑक्टोबर २०२२ | जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार उद्या दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात होणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीत १४ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त वाचून कायम करणे व इतिवृत्ताच्या अनुपालनास मान्यता देणे, ३१ मार्च, २०२२अखेरील जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण योजना, आदिवासी घटक कार्यक्रम व अनुसूचित जाती घटक कार्यक्रम) खर्चास मान्यता देणे, ३० सप्टेंबर, २०२२ अखेर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या (सर्वसाधारण योजना, आदिवासी घटक कार्यक्रम व अनुसूचित जाती घटक कार्यक्रम) खर्चाचा आढावा, गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या लम्पी रोग नियंत्रणात आणण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी पुनर्विनियोजनाने उपलब्ध करून देण्यास मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा होईल, अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी दिली .

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like