उपमुख्यमंत्र्यांनी केली सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा
खान्देश लाईव्ह | ४ नोव्हेंबर २०२२ | महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत ही पूजा केली. तर यंदा औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखेदाम्पत्याला उपमुख्यमंत्र्याबरोबर शासकीय पूजा करण्याचा मान मिळाला. आषाढी आणि कार्तिकी या दोनही महापूजेचा मान मिळवणारे फडणवीस हे पहिजे राजकारणी ठरले आहेत.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विठ्ठल हा सामान्य माणसांचा, कष्टकर्यांचा, शेतकर्यांचा देव आहे. त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस यावेत, त्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं, यासाठी काम करण्याची शक्ती आम्हाला मिळो अशी प्रार्थना आज आपण केल्याचे ते म्हणाले.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम