अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्ह | ६ नोव्हेंबर २०२२ | आज अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके 66247 इतक्या मतांनी विजयी झाल्या आहेत. तर नोटाला 12776 इतकी मत मिळाली आहेत.

राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. तसेच ही निवडणूक अटीतटीची ठरली आहे. ठाकरे गटाचे (Thackeray group) नेते अनिल परब )यांनी या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना 90 ते 95 टक्के मतं मिळतील, असा अंदाजही व्यक्त केला होता. दरम्यान, ऋतुजा लटके पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातही जास्त मतांनी विजयी ठरल्या.

आज सकाळी 8 वाजता टपाली मतमोजणीस सुरवात झाली होती. भाजपच्या मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली. त्यामुळे मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या तीन ते चार तासांमध्येच निकाल स्पष्ट होईल, असा राजकीय जाणकारांनी अंदाज व्यक्त केला होता.

मतदारांच्या निरुउत्साहामुळे निवडणुकीत अवघे 31.74 टक्के इतके मतदान झाले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण 2,71,000 मतदार आहेत. मात्र, यापैकी फक्त 31.74 टक्के म्हणजे 85,698 नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

दरम्यान भाजपच्या मुरजी पटेल यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली. त्यामुळे ही पोटनिवडणूक एकतर्फी झाली. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, मतदानाच्या काही दिवस आधी भाजपकडून पडद्यामागून ‘नोटा’चा प्रचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. ऋतुजा लटके यांच्यापेक्षा नोटा या पर्यायाला जास्त मतं पडावीत, यासाठी पद्धतशीर आखणी केली जात असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे होते. परंतु ऋतुजा लटके यांच्यानंतर ची दुसरी जास्त मते नोटाला मिळण्याच यावेळी दिसून आलं आहे.

 

 

 

बातमी शेअर करा

खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम

You might also like