राष्ट्रवादीच्या दोनशे कार्यकर्त्यांचा बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश
खान्देश लाईव्ह | ६ नोव्हेंबर २०२२ | भडगाव राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत दोनशे कार्यकर्त्यासह बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश केला. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थिती त्यांचा प्रवेश झाला. स्वप्नील पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने भडगाव तालुक्यासह विशेषत: आमडदे गावात शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.
वाक ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आमदार किशोर पाटीलांशी चर्चा करत बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी काल रात्री पाचोरा येथील शिवेसेना कार्यालयात वाक व वलवाडी येथील दोनशे कार्यकर्त्यांसह आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थीत प्रवेश केला. यात राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांसह वलवाडी ग्रामपंचायतीचे सदस्यांनी प्रवेश केला. यावेळी स्वप्निल पाटील यांनी सांगतीले की, तालुक्याच्या विकासासाठी मी शिवसेनेत प्रवेश करतो आहे. आगामी काळात शिवसेनेचे संघटन मजबुत करण्यावर आपला भर असणार आहे. आमदार किशोर पाटील हे जी पण जबाबदारी देतील ती सक्षमपणे पेलू असा विश्वास व्यक्त केला.
यावर आमदार किशोर पाटील म्हणाले की, स्वप्निल पाटील यांनी विकासाची जी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यापैकी काही कामे मंजूर आहेत. तर काही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आगामी काळात निश्चितपणे तालुक्याचा चेहरामोहरा बदल्याशिवाय राहणार नाही असे सांगत स्वप्नील पाटील यांचे स्वागत केले. त्याच्यां प्रवेशाने निश्चितपणे शिवसेनेची ताकद वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय पाटील, शहरप्रमुख अजय चौधरी, वडध्याचे युवराज पाटील, युवासेनेचे तालुकाप्रमुख पुरुषोत्तम महाजन, महेंद्र ततार, निलेश पाटील, पाचोरा तालुकाप्रमुख सुनील पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर आदि उपस्थीत होते.
खान्देश लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम